BJP leaders retaliate against Sanjay Raut

संजय राऊत राज्यातील सत्ताधाऱ्यांचे सल्लागार म्हणुन ओळखले जातात. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांच्यावरही ते नेहमीच गरळ ओकतात. ज्या अजित पवारांच्या विरोधात आदल्या दिवशी संपादकीय लेख लिहितात तेच अजित पवार पुन्हा महाआघाडीतुन उपमुख्यमंत्री झाले की त्यांच्या नावाचा उदोउदो करतात अशी टीका भाजपने केली आहे.

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीची नोटीस आली की महाराष्ट्रात विशेषत: सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते स्वत:चा भ्रष्टाचार झाकण्यासाठी नोटीसाला राजकिय रंग लावतात आणि चिखलात ढकलुन दिल्यासारखे ओरडतात. लोकनियुक्त केंद्र सरकारला शिव्या घालतात, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या संपादकाला संजय राऊतांनी अभिनेत्री कंगना रानावत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आत्मचिंतन करावे अशी अपेक्षा भाजप प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात संजय राऊत हे नाव महाविकास आघाडी सरकारची निर्मिती करण्यात त्यांचा पुढाकार आणि त्या आधी एखादा पिक्चर चांगला चालल्यानंतर निर्माता म्हणून झाली. मात्र, मागच्या एका वर्षापासुन रात्रंदिवस ते भाजपावर तुटुन पडतात, बेताल वक्तव्येही करतात असे राम कुलकर्णी म्हणाले.

राज्यातील सत्ताधाऱ्यांचे ते सल्लागार म्हणुन ओळखले जातात. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा यांच्यावरही ते नेहमीच गरळ ओकतात. ज्या अजित पवारांच्या विरोधात आदल्या दिवशी संपादकीय लेख लिहितात तेच अजित पवार पुन्हा महाआघाडीतुन उपमुख्यमंत्री झाले की त्यांच्या नावाचा उदोउदो करतात असेही राम कुलकर्णी म्हणाले.

राऊतांचा सामना एक दिवसाआड भुमिका बदलतो आणि स्तुतीपाठकांच्या रांगेत जावुन बसतो हे तितकेच खरे. संजय राऊत जे संपादक आहेत त्यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचे आणि विरोधकांनी आणले  हे पराचा कावळा करत ओरडायचे हे योग्य नाही असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.