मुंबई : सर्वसामान्य जनता वीजबिलात सुट द्या म्हणत रस्त्यावर उतरली  मात्र सरकारने घरपट्टी पाणीपट्टी कशातही सुट दिली नाही. लहानमोठ्या व्यापा-यानी वांरवांर मागणी करून काही मिळत नाही. मात्र, दारू परवान्यांवर थेट ५०% सुट सरकारने दिली यावर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टिका केली आहे.

दारूवाल्यांची सेवा हा महाविकास आघाडी सरकारचा कॉमन मिनीमम प्रोग्रॅम आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे. मंदीरांच्या आधी मदीरालये सरकारने सुरू केली. मात्र सर्वसामान्यासाठी कोणताही दिलासा दिला नाही तर हे सरकार नक्की कुणासाठी काम करत आहे असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

ही तर “मद्यविकास आघाडी” असल्याची टिका आचार्य तुषार भोसलें यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एकीकडे राम मंदिराच्या लोक वर्गणीला विरोध, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही, नागरिकांना  वीजबीलात जाहीर केलेली सूट नाकारली दुसरीकडे मात्र मद्यविक्रीच्या परवान्यांना सूट दिली! अशी टिका भोसले यांनी केली.