प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत ‘मराठी कट्टा’ ही नवी संकल्पना येत्या १ ऑक्टोबरपासून भाजप राबवणार आहे. त्यासाठी भाजप तयारीला लागली आहे.

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत ‘मराठी कट्टा’ ही नवी संकल्पना येत्या १ ऑक्टोबरपासून भाजप राबवणार आहे. त्यासाठी भाजप तयारीला लागली आहे.

    मुंबई महापालिकेत मागील अनेक वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. यापूर्वी पालिकेत काही वर्ष शिवसेना भाजपची सत्ता होती. गेल्या विधानसभा निवडणुकीच्य़ावेळी शिवसेना – भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेना -भाजपमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला आहे. सद्या राज्यात शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससोबत युती करून सत्तेत आहे. शिवसेना – भाजपमधील सद्याच्या राजकीय आरोप – प्रत्योरोपामुळे येत्या मुंबई महापालिकेत युती होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

    मागील एक ते दीड वर्षापासून भाजपने कंबर कसली आहे. पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेनेला हरवण्यासाठी भाजपने प्रभागानुसार व्हुरचना तयार केली आहे. शिवसेनेच्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मराठी कट्टा’ संकल्पना राबवणार आहे. याची सुरुवात १ ऑक्टोबरपासून सुरुवात केली जाणार आहे.

    आमदार नितेश राणे आणि सुनील राणे यांच्याकडे ‘मराठी कट्टा’ आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. चेंबूर घाटला व्हिलेज येथे पहिला ‘मराठी कट्टा’ आयोजित होणार आहे. मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसेच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेल्या अन्यायावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न मुंबई भाजप या संकल्पनेतून करणार असल्याचे सांगण्यात आले.