Strong rift in the Assembly; Opposition's resignation Marathwada, Vidarbha held hostage for 12 MLAs

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपने १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याच्या चर्चाना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस(Opposition leader Devendra Fadnavis) यांनी खुलासा केल्याने पूर्ण विराम लागला आहे.

    मुंबई : राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपने १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याच्या चर्चाना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस(Opposition leader Devendra Fadnavis) यांनी खुलासा केल्याने पूर्ण विराम लागला आहे.

    भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसे आहोत, सौदेबाजी करणारी नाही, अश्या शब्दात त्यांनी याबाबतच्या अफवा पसरविण्यात येत असल्याचे सांगितले.

    बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी फडणवीस यांची भेट घेत विनंती केली की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यावर आमची कोअर कमिटी, आमचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असे सांगितल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत चर्चाच झाली नाही.

    भारतीय जनता पार्ट सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे. १२ आमदारांचे निलंबन हे नियमबाह्य आहे. आम्ही त्याबाबत न्यायालयात दाद मागितली आहे. आम्ही न्यायालयात लढाई लढू आणि बाहेरही लढू. असे फडणवीस म्हणाले.