एकमेकांवर आरोप करुन ओबीसींचा प्रश्न सुटणार नाही तर… विजय वडेट्टीवार यांची भूमिका

ओबीसीच्या मुद्यावरून राजकारण करण्यासाठी भाजपने शक्ती पणाला लावली आहे मात्र आधी मुंडे साहेब होते, आज भुजबळ साहेब ओबीसी साठी लढतायत, एकमेकांवर आरोप करुन ओबीसींचा प्रश्न सुटणार नाही अशी भुमिका ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार यानी मांडली आहे.

    मुंबई : ओबीसीच्या मुद्यावरून राजकारण करण्यासाठी भाजपने शक्ती पणाला लावली आहे मात्र आधी मुंडे साहेब होते, आज भुजबळ साहेब ओबीसी साठी लढतायत, एकमेकांवर आरोप करुन ओबीसींचा प्रश्न सुटणार नाही अशी भुमिका ओबीसी मंत्रालयाचे मंत्री विजय वडेट्टीवार यानी मांडली आहे.

    पक्षाचे विचार बाजूला ठेऊन, पक्षाची झुल बाजूला ठेऊन, ज्या समाजाने मोठे केले त्या ओबीसी समाजासाठी लढावे असे ते म्हणाले. पावणेपाचशे जातींचा ओबीसी समूह आहे. प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी विस्थापितांनी एकत्र यायला हवे. आजही ओबीसीतला घटक गावाबाहेर पालात राहतो असेही वडेट्टीवर म्हणाले.