nightlife

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारानंतर महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच इतर देशांमधून येणाऱ्या फ्लाईट्समधील लोकांना क्वारंटाईन(quarantine) करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल(iqbalsing chahal) यांनीही महत्वाची माहिती दिली आहे.

मुंबई : ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारानंतर महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. तसेच इतर देशांमधून येणाऱ्या फ्लाईट्समधील लोकांना क्वारंटाईन(quarantine) करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल(iqbalsing chahal) यांनीही महत्वाची माहिती दिली आहे.

चहल यांनी म्हटले आहे की, उद्या रात्री २.३० पासून युकेवरून एकही फ्लाईट लँड होणार नाही. जे आता तेथून टेक ऑफ झालेत, त्यामधील प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल, एकही जण घरी सोडला जाणार नाही. पाच फ्लाईट येणार असून १ हजार जण असतील. लक्षणे असतील तर सेव्हन हिल्समध्ये ठेवले जाईल. लक्षणे नसलेल्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाईल.

चहल यांनी पुढे सांगितले की, इतर युरोपीयन देशांतून येणाऱ्या फ्लाईटमधील लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन केले जाईल. लक्षणे असलेल्यांना जीटी रूग्णालयात दाखल केले जाईल. इतरांना हॉटेलमध्ये ठेवले जाईल. एकालाही मुंबई सोडता येणार नाही. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना हाताळणाऱ्यांना मोफत पीपीई कीट दिले जाणार आहे. इतर देशांतून येणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. लक्षणे नसलेल्यांना हातावर शिक्का मारून होम क्वारंटाईन केले जाईल. २ हजार जणांची हॉटेलमध्ये क्वारंटाईन करता व्यवस्था केली गेली आहे.

२३ डिसेंबरपासून रात्री ११ ते ६ नाईट कर्फ्यू मुंबईत असेल. हा काही लॉकडाऊन नाही. रात्री ५ पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही. दूध,भाजीपाला वाहतूकीवर परिणाम होणार नाही. रात्री ११ पर्यंत सर्व काम आताप्रमाणे सुरू राहिल. नवीन विषाणूबाबत अद्याप डॉक्टरांना अधिक माहिती नाही, त्यामुळं विलगीकरण महत्वाचे असल्याचे चहल यांनी सांगितले आहे.