holi festival

‘मी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत व्यक्तीगत पातळीवरही होळीचा उत्सव(bmc restriction for holi) साजरा करणे टाळावे, असे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे. होळी आणि धुळवड सार्वजनिकरित्या साजरी करण्यास मुंबई महानगरपालिकेने मनाई केली आहे.

    मुंबई:काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हाेळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोनाबाबतची सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे. तसेच होळी आणि धुळवड सार्वजनिकरित्या साजरी करण्यास मुंबई महानगरपालिकेने मनाई केली आहे.

    ‘मी जबाबदार’ या मोहिमेअंतर्गत व्यक्तीगत पातळीवरही होळीचा उत्सव साजरा करणे टाळावे, असे आवाहन मुंबई पालिकेने केले आहे. याबाबतच्या नियमावलीनुसार नियमांचे उल्लंघन केल्यास साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ आणि भारतीय दंड संविधानाअंतर्गत असणाऱ्या १८६० कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

    दरवर्षी, मुंबई आणि उपनगरीय परिसरामध्ये होळी आणि धुळवडीच्या निमित्तानं अनेक सामुहिक कार्यक्रमांचे जल्लाेषात आयाेजन केले जाते. मात्र काेराेनाच्या संकटामुळे यंदा उत्साहाला आवर घालण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पालिकेने अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. याआधी मॉलमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचा निर्णय पालिकेने जाहीर केला होता. आता होळीवरही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा होळी आणि रंगपंचमीवरही कोरोनाचे सावट आहे , असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.