BMC ऑफिसर फिरणार स्कॉर्पिओतून; २ कोटी ८३ लाख खर्चून पालिका खरेदी करणार २४ नव्या को-या स्कॉर्पिओ

मुंबई पालिकेच्या २४ प्रभागाच्च्या सहाय्यक पालिका आयुक्तांसाठी पालिकेने नव्याकोऱ्या २४ स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, २ कोटी ८३ लाख रुपये खर्च येणार आहे(BMC officer to travel from Scorpio; The corporation will buy 24 new Scorpios at a cost of Rs 2 crore 83 lakh).

    मुंबई : मुंबई पालिकेच्या २४ प्रभागाच्च्या सहाय्यक पालिका आयुक्तांसाठी पालिकेने नव्याकोऱ्या २४ स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, २ कोटी ८३ लाख रुपये खर्च येणार आहे(BMC officer to travel from Scorpio; The corporation will buy 24 new Scorpios at a cost of Rs 2 crore 83 lakh).

    सध्या २४ सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाड्या क्षमतेपेक्षा जास्त वापरली गेल्याने त्यात वारंवार बिघाड झाला आहे. त्यामुळे, नवीन स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणा-या स्थायी समितीत मांडला जाणार आहे.

    मुंबई पालिका रचनेत २४ विभाग असून त्यास प्रत्येक प्रभागासाठी प्रत्येकी एक सहाय्यक आयुक्त नेमले जातात. सहाय्यक आयुक्तांकडे त्या-त्या विभागाचे प्रशासन, नियोजन आदी कामांची जबाबदारी असते. सध्या, सहाय्यक आयुक्त वापरत असलेल्या स्कॉर्पिओ गाड्या जुन्या झाल्या असून त्यात सतत बिघाड होत असल्याने ही खरेदी केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    पालिकेने २०१४ मध्ये उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांसाठी २०१४ मध्ये २८ स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये सहाय्यक आयुक्तांसाठी २४ स्कॉर्पिओची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गाडीमागे ११ लाख २८ हजार रु. खर्च करणार आहे. पालिकेस या गाड्या १५ टक्के कमी दराने उपलब्ध होणार आहे.

    केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरुन सर्व स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी केली जाणार आहे. बाजारभावानुसार स्कॉर्पिओच्या एका गाडीची किंमत १३ लाख सात हजार रुपये एवढी आहे. मात्र, पालिकेस त्या खरेदीत १५ टक्के इतकी सवलत मिळणार असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.