कंत्राटी कामगारांना पालिकेचा ‘आधार’, पगाराचे पैसे देण्यासाठी १ कोटी ८२ लाखांची मदत

कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यासाठी मुंबई (Mumbai) महापालिकेने (BMC) पुढाकार घेतला आहे. या कामगारांचे थकित पैसे, वेतन देण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ कोटी ८२ लाखांची मदत (1 Crore 82 Lakh Help To BMC Contract Workers) करणार असल्याने कंत्राटी कामगारांना पालिकेचा आधार मिळाला आहे.

    मुंबई: मुंबई महापालिकेच्या दवाखान्यात कंत्राटी तत्वावर कामगार, शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यासाठी मुंबई (Mumbai) महापालिकेने (BMC) पुढाकार घेतला आहे. या कामगारांचे थकित पैसे, वेतन देण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ कोटी ८२ लाखांची मदत (1 Crore 82 Lakh Help To BMC Contract Workers) करणार असल्याने कंत्राटी कामगारांना पालिकेचा आधार मिळाला आहे.

    मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित २४ वॉर्डात १८६ दवाखाने कार्यरत आहेत. या सगळ्या दवाखान्यात कामासाठी कामगरांचा अभाव निर्माण झाल्याने कंत्राटी पद्धतीवर कामगार भरतीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या १८६ दवाखान्यांपैकी १५ दवाखाने सायंकाळी रात्री १० वाजेपर्यंत सुरु असतात. त्यामुळे कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटी कामगारांचे व सायंकाळी कार्यरत कामगारांचे, कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी आदींचे मानधन देण्यासाठी मुंबई महापालिकेने ३.४५ कोटी रुपयांची आर्थिक वर्षांत तरतूद करण्यात आली होती.

    या तरतूद  केलेल्या रकमेपैकी ५९.४० लाखांचा निधी शिल्लक असल्याने कंत्राटी कामगारांचे पैसे देण्यासाठी आता मुंबई महापालिकेने आणखी १.८२ कोटी रुपये देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.