mumbai fire brigade

वरळी अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट(Structural Audit ) करण्यात आले आहे. या इमारतीचे आता दुरुस्तीचे( BMC Ready For Worli Fire Brigade Building Repair) काम हाती घेतले जाणार आहे.

    मुंबई : मुंबई पालिकेकडून (BMC) वरळी अग्निशमन केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट(Structural Audit ) करण्यात आले आहे. या इमारतीचे आता दुरुस्तीचे(Worli Fire Brigade Building Repair) काम हाती घेतले जाणार आहे. तीन मजली असलेल्या या इमारतीतील अनेक दुरुस्ती कामे केली जाणार आहेत. या कामासाठी कंत्राटदाराने स्थापत्य कामांसाठी उणे ३३.३५ आणि विद्युत कामासाठी उणे २४ टक्के दराने कामे करण्यास तयारी दर्शविली आहे. सर्व करांसहीत या कामांसाठी १ कोटी १८ लाख रुपये एवढा खर्च येणार आहे.

    जी दक्षिण विभागातील जे. बी. टेमकर मार्गावर वरळी अग्निशमन केंद्राची इमारत आहे. पालिकेने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली होती. त्या सल्लागाराने दिलेल्या अहवालानुसार वरळी अग्निशमन केंद्र इमारतीचे दुरुस्ती केली जाणार आहे. त्यात, दुरुस्तीसाठी लादी बसविणे, रंगकाम, प्लम्बिंग कामे, विद्युत कामे, इमारतीच्या आजुबाजूच्या परिसरातील काँक्रीट रस्त्याची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.

    पालिकेने या कामांसाठी मागविलेल्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदाराने स्थापत्य कामावर उणे ३३.३५ टक्के आणि विद्युत कामावर उणे २४ टक्के दराने काम करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यात, एकूण करांसह १ कोटी १७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.