मुंबईतील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित आदी गरजू महिलांना BMC देणार स्वयंरोजगार; ६ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई महापालिका जेंडर बजेट अंतर्गत दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच मुंबईतील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित आदी गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी तब्बल ६ कोटी २२ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना पालिकेतर्फे शिलाई मशीन, वाती बनविण्याचे यंत्र आणि घरघंटी रोजगारासाठी उपलब्ध होणार आहे(BMC will provide self-employment to needy women like widows, abandoned, divorced etc. in Mumbai; Provision of Rs. 6 crore).

    मुंबई : मुंबई महापालिका जेंडर बजेट अंतर्गत दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच मुंबईतील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित आदी गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी तब्बल ६ कोटी २२ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना पालिकेतर्फे शिलाई मशीन, वाती बनविण्याचे यंत्र आणि घरघंटी रोजगारासाठी उपलब्ध होणार आहे(BMC will provide self-employment to needy women like widows, abandoned, divorced etc. in Mumbai; Provision of Rs. 6 crore).

    विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, ४० वर्षावरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी महिला व गरीब, गरजू महिला, कोविडमुळे पतीच्या निधनामुळे विधवा झालेल्या महिलांना पालिका घरबसल्या स्वयंरोजगार उपलब्ध करणार आहे. पालिकेला २२७ वार्डात प्रत्येकी ५ शिलाई मशीन याप्रमाणे १ हजार १३५ शिलाई मशीन खरेदी करून त्यांचे वाटप करण्यासाठी १ कोटी ३८ लाख ७० हजार ८३५ रुपये एवढा खर्च येणार आहे.

    तसेच, २२७ वार्डात प्रत्येकी ४ वाती बनविण्याचे यंत्रे याप्रमाणे ९०८ यंत्रे खरेदी करून त्यांचे वाटप करण्यासाठी ३ कोटी १ लाख ७२ हजार ८४० रुपये खर्च येणार आहे. तसेच २२७ वार्डात प्रत्येकी ४ याप्रमाणे ९०८ घरघंटया खरेदी करून त्यांचे वाटप करण्यासाठी १ कोटी ८२ लाख १५ हजार ३८८ रुपये खर्च केला जाणार आहे.

    पालिकेला यासाठी ५ कोटी ९१ लाख ४५ हजार ७५८ रुपये एवढा निधी खर्च करायचा आहे. तर पात्र गरीब, गरजू महिलांना एकूण ५ टक्के खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील २२७ वार्डात प्रत्येकी १३ वस्तूंसाठी पालिकेला तब्बल ६ कोटी २२ लाख ५९ हजार ६३ रुपये खर्च येणार आहे.

    या योजनेसाठी पिवळी, केशरी शिधापत्रिका व वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असायला हवे. वयोमर्यादेची अट १८ ते ६०, विधवा महिलांनी पतीच्या मृत्यूबाबतचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. मुंबईतील १५ वर्षे वास्तव्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, घटस्फोटित महिलेने दाव्याचे कागदपत्रे, गिरणी कामगार महिलेने आवश्यक सादर करावे लागणार आहेत.