
कोविडच्या दुसऱ्या लाटेत महानगर पालिकेने विगलीकरणासाठी हाॅटेल्स ताब्यात घेण्यात आले होते. या हॉटेल्सना सलग दुसऱ्या वर्षीही मालमत्ता करात सुट देण्यात येणार आहे. यंदा 41 कोटी 87 लाख रुपयांची सुट देण्याचा प्रस्ताव महानगर पालिका प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
मुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेत महानगर पालिकेने विगलीकरणासाठी हाॅटेल्स ताब्यात घेण्यात आले होते. या हॉटेल्सना सलग दुसऱ्या वर्षीही मालमत्ता करात सुट देण्यात येणार आहे. यंदा 41 कोटी 87 लाख रुपयांची सुट देण्याचा प्रस्ताव महानगर पालिका प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
कोविडच्या पहिल्या लाटेत महानगर पालिकेने संशयीतांसह बाधीतांच्या विलगीकरणा साठी हॉटेल्स ताब्यात घेतले होते.त्यासाठी त्यांना 20 कोटी रुपयांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला होता.तेव्हा 180 च्या हॉटेल्सना मालमत्ता कर माफ करण्यात आला होता.तर,आता 234 मालमत्तांना चार महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
41 कोटी 87 लाख रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. यात मुंबईतील सर्व पंचतारांकीत हाॅटेल्ससह 233 हॉटेल्सना ही सुट मिळणार आहे. भायखळा येथील रिसर्डस ॲन्ड क्रुडास कंपनीनतही पालिकेने विलगीकरण केंद्र सुरु केले आहे. या कंपनीलाही मालमत्ता करात सुट दिली जाणार आहे.