अंगाची लाही-लाही, राज्यात उष्णतेची लाट, राज्यातील विविध भागात ४० पार पारा, गरमी टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

राज्यातल्या अनेक शहरांत पारा 40 अंश सेल्सियसच्या पार गेलाय. हवामान खात्यानं आज विदर्भात उष्णतच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. दरम्यान रविवारपासून राज्यात अनेक ठिकाणी पारा ४० शी पार गेला आहे, त्यामुळं अंगाची लाही लाही होत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईस, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेलं होतं.

    मुंबई : राज्यात मागील आठवड्यापासून कमालीचे उष्णता वाढली असून, तापमानाचा पारा वाढला आहे. राज्यातल्या अनेक शहरांत पारा 40 अंश सेल्सियसच्या पार गेलाय. हवामान खात्यानं आज विदर्भात उष्णतच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. दरम्यान रविवारपासून राज्यात अनेक ठिकाणी पारा ४० शी पार गेला आहे, त्यामुळं अंगाची लाही लाही होत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईस, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेलं होतं. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेलं होतं. मुंबईमध्ये 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर गेला होता. दरम्यान, आज मुंबईत ग्रीन अलर्ट दिला आहे. त्यामुळं घराबाहेर पडत असाल तर, काळजी घ्या, थंड पेय, पाणी, लिंबू सरबत पिण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आह.

    दरम्यान, कालही विदर्भातल्या अनेक शहरांचा पारा 40 अंशांपार गेला होता. आज विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. इकडे कोकणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असली तरी कोकणातलं तापमान स्थिर आहे. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे. या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. विदर्भातील अकोल्यात तापमान 42.9 डिग्री सेल्सीअसवर पोहचले. अमरावतीत 41 डिग्री सेल्सिअस तापमान पोहचले. चंद्रपुरात 40.6 डिग्री सेल्सिअस तापमान होते. वाढत्या उन्हामुळे उष्माघातासारख्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो, त्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

    गरमी टाळण्यासाठी हे करा

    उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. उन्हात कष्टाची कामे करू नका. उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा, गॉगल्सचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकावे. लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमित प्यावे, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळा. शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करण्यात यावा, गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावेत. स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा. असेही आवाहन आरोग्य विभागाद्वारे केले आहे.