bonito

गेल्या वर्षी सचिन वाझे सीआययु पथकाचे प्रमुख असताना दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. छाब्रिया यांच्यावर डिसी अवंती स्पोर्ट्स कारमध्ये (DC Avanti sports car) घोटाळा केल्याचा आरोप होता. याचवेळी कपिल शर्मा यानेही सीआययु पथकात त्याची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती.

    मुंबई : मुंबई पोलीसांच्या(Mumbai Police) सीआययु युनिटने कार डिझायनर दिलीप छाब्रिया (Dilip Chhabria) यांचा मुलगा बोनिटो छाब्रियाला(Bonito Chhabria Arrested) अटक केली आहे. कॉमेडियन कपिल शर्मा(Kapil Sharma) याने व्हॅनिटी व्हॅन बनवून घेण्यासाठी दिलेल्या पैशांच्या अपहार(Car Scam) प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

    गेल्या वर्षी सचिन वाझे सीआययु पथकाचे प्रमुख असताना दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. छाब्रिया यांच्यावर डिसी अवंती स्पोर्ट्स कारमध्ये (DC Avanti sports car) घोटाळा केल्याचा आरोप होता. याचवेळी कपिल शर्मा यानेही सीआययु पथकात त्याची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. कपिल शर्माने केलेला व्यवहार छाब्रिया यांच्या मुलाच्या खात्यावर झाला होता, त्यात त्याने अपहार केला असा आरोप करण्यात आला आहे.

    गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी डिझायनर कार खरेदी, विक्री आणि फायनान्स करुन लोकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आणला होता. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज वर्वण्यात आला होता. या फसवणूकच्या गुन्ह्यात प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. दिलीप छाब्रिया या डिझाइन्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीचे मालक आहेत.