Boxes of thermocol will be banished from the fish market The corporation will buy plastic containers

मुंबई महापालिका मासळी बाजारात मासळी विक्रेत्यांना प्लास्टीकचे कंटेनर देणार आहे. त्यामुळे मासळी बाजारातून थर्माकॉलच्या पेट्या आता हद्दपार होणार आहेत(Boxes of thermocol will be banished from the fish market The corporation will buy plastic containers). या प्रत्येक कंटेनरमागे पालिकेला किमान ५०० ते एक हजार रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

  मुंबई : मुंबई महापालिका मासळी बाजारात मासळी विक्रेत्यांना प्लास्टीकचे कंटेनर देणार आहे. त्यामुळे मासळी बाजारातून थर्माकॉलच्या पेट्या आता हद्दपार होणार आहेत(Boxes of thermocol will be banished from the fish market The corporation will buy plastic containers). या प्रत्येक कंटेनरमागे पालिकेला किमान ५०० ते एक हजार रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.

  मुंबई महानगरपालिकेच्या मंडईत ३ हजार ७४१ परवानधारक कोळी महिला आहेत. यातील मागील वर्षी ५७८ कोळी महिलांना प्लास्टीक कंटेनर्ससाठी अर्थसहाय्य देण्यात आले. यावर्षी उर्वरीत महिलांना पालिका असे कंटेनर्स स्वत: खरेदी करून देणार आहे. ५०, ते ७० लिटर क्षमतेचे तीन आईस बॉक्‍स कंटेनर्स पालिका विकत घेऊन देणार आहे. ३ हजाराच्या आसपास विक्रेत्यांना कंटेनर्स देण्यासाठी महानगर पालिका ४ कोटी २७ लाख रुपयांचा खर्च करणार आहे.

  या ५० लिटरच्या कंटेनरसाठी पालिका प्रत्येकी २ हजार ९३० रुपये, ६० लिटरच्या कंटेनरसाठी प्रत्येकी ४ हजार १ रुपया. तर, ७० लिटरच्या कंटेनरसाठी ६ हजार ६२४ रुपयांचा खर्च करणार आहे. या कंटेनर्सच्या किंमती ऑनलाईन तपासल्या असत्या ६० लिटरचे कंटेनर ३ हजार पासून ३ हजार ५०० रुपयां पर्यंत तर ७० लिटर कंटेनर्सची किंमत ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयां पर्यंत उपलब्ध आहेत. स्थायी समितीत या प्रस्तावावर वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

  मुंबईतील ३ हजार १६३ महिलांना या टप्प्यात कंटेनर बॉक्‍स देण्यात येणार होते.त्यातील १४८ महिला या मुंबई बाहेरील रहिवाशी असल्याने त्यांना हे कंटेनर देण्यात येणार आहे. पालिकेच्या जेंडर बजेट अंतग्रत ही खरेदी करण्यात येणार आहे. यात, योजनेचा लाभार्थी हा मुंबईचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

  अविघटनशिल वस्तूंच्या वापरावर निर्बंध

  राज्य सरकारने राज्यात प्लास्टीक आणि थर्माकॉल तसेच इतर अविघटनशिल वस्तूंच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. मासळी बाजारात थर्माकॉलचे वापरण्यात येणारे कंटेनरचा कचरा होऊन प्रदूषणात भर पडते. त्यामुळे महानगर पालिकेने मासळी बाजारातील थर्माकॉलच्या पेट्य़ा हद्दपार करण्यासाठी अशा प्रकारचे दिर्घकाळ वापरता येणारे प्लास्टिक कंटेनर्स महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे.