१ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू, मुंडे आणि राठोड प्रकरणासह वीजेच्या मुद्द्यावरून अधिवेशनात वादळ येण्याची शक्यता

धनंजय मुंडे यांचे सहमतीचे प्रकरण असल्यामुळे राज्यातील जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. करुणा शर्मा आणि त्यांच्या भगिनींनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याचे उघड झाल्यामुळे या नाजूक प्रकरणावर पडदा पडला आहे. मात्र बीडमधील पूजा चव्हाण प्रकरणी अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

    १ मार्चपासून राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणासह मोफत विजेच्या मुद्द्यावरून विरोधकांमुळे अधिवेशनात वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    धनंजय मुंडे यांचे सहमतीचे प्रकरण असल्यामुळे राज्यातील जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. करुणा शर्मा आणि त्यांच्या भगिनींनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याचे उघड झाल्यामुळे या नाजूक प्रकरणावर पडदा पडला आहे. मात्र बीडमधील पूजा चव्हाण प्रकरणी अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला असला तरी राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्वसामान्य ग्राहकांना मोफत वीज देण्याचा घोषणा केली. मात्र, त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या काळातील वाढीव वीजबिल, शेतकर्‍यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहेत.