दिवंगत लेखक मुल्कराज आनंद यांची जमीन बळकावल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला यांना इडीकडून अटक

या जमिनीचा बाजारभाव ५० कोटी रुपये आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी लकडवाला यांनी सरकारी संबंधित अधिकाऱ्यांना ११.५० कोटी रुपयांची लाच दिली. त्यामुळेच यांत पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसारच मनी लाँडरिंगअंतर्गत चौकशीसाठी ईडीने लकडावाला यांना चार वेळा समन्स बजावले.

  मुंबई : बांधकाम व्यावसायिक युसुफ लाकडवाला यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. दिवंगत लेखक मुल्कराज आनंद यांची जमीन बळकावल्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे.

  लंडनला पळून जाण्याच्या बेतात

  मुल्कराज आनंद यांची खंडाळा येथे जमीन आहे. ती जमीन त्यांना हैदराबादचे नवाब हिमायत नवाझ जंग बहाद्दूर यांनी त्यांना दिली होती. युसुफ लकडवाला यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ही जमीन बळकावली. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाने एप्रिल २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता.

  गुन्हा दाखल होताच युसुफ लकडवाला हे लंडनला पळून जाण्याच्या बेतात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अहमदाबाद विमानतळावर अटक केली. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यापासूनच ‘ईडी’ त्यांच्या मागावर आहे.

  चार वेळा समन्स बजावले.

  या जमिनीचा बाजारभाव ५० कोटी रुपये आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी लकडवाला यांनी सरकारी संबंधित अधिकाऱ्यांना ११.५० कोटी रुपयांची लाच दिली. त्यामुळेच यांत पैशांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट आहे. त्यानुसारच मनी लाँडरिंगअंतर्गत चौकशीसाठी ईडीने लकडावाला यांना चार वेळा समन्स बजावले.

  परंतु ते चौकशीसाठी आले नाहीत. त्यामुळेच अखेर त्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली,’ असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात लकडवाला यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आता या प्रकरणात पुढील टप्प्यात त्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.