जालन जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांच्या कामाची माहिती घेतली. यावेळी बैठकीत पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपआपल्या भागातील जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्न मांडले. जालना हा मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा असून, इथल्या लोकप्रतिनिधींनी जे प्रश्न मांडले त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

    जालना : जिल्ह्यातील हातवन बृहत ल.पा प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्याचे व गलाटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढून प्रकल्पाची साठवण क्षमता वाढवण्याबाबत उपाययोजना करण्याचे तसेच जिल्ह्यातील अकार्यान्वित असलेल्या योजनांमधील अडचणी दूर करून कार्यान्वित करण्याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिले.

    आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जलसंपदा विभागाची आढावा बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्प व योजनांच्या कामाची माहिती घेतली. यावेळी बैठकीत पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपआपल्या भागातील जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्न मांडले. जालना हा मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा असून, इथल्या लोकप्रतिनिधींनी जे प्रश्न मांडले त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

    जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्राची सिंचन क्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचनाही जयंत पाटील यांनी दिल्या. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, जालना जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.