
महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या नाराजीवजा टोलेबाजीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमातील निवेदिकेच्या सूचनांमुळे पवार यांच्यासह सर्वच उपस्थितांना वारंवार खुर्चीवरून उठ-बस करावी लागली. यामुळे आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच पवार यांनी निवेदिकेवर आणि कार्यक्रमाच्या आयोजनावर मिश्किलपणे नाराजी व्यक्त केली. एकदा तुमच्या हातात माईक आल्यावर आम्हाला काही बोलता येत नाही अन् मुख्यमंत्र्यांपुढे आमचे काही चालतही नाही, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या नाराजीवजा टोलेबाजीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमातील निवेदिकेच्या सूचनांमुळे पवार यांच्यासह सर्वच उपस्थितांना वारंवार खुर्चीवरून उठ-बस करावी लागली. यामुळे आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच पवार यांनी निवेदिकेवर आणि कार्यक्रमाच्या आयोजनावर मिश्किलपणे नाराजी व्यक्त केली. एकदा तुमच्या हातात माईक आल्यावर आम्हाला काही बोलता येत नाही अन् मुख्यमंत्र्यांपुढे आमचे काही चालतही नाही, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
मला विमानात जागा ठेवा
मी बरेच वर्षांपासून समाजकारण, राजकारण कराणारा कार्यकर्ता आहे. 1991-92 ला मला राज्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. या सर्व गोष्टींना तीस वर्षे उलटले आहेत. आमच्या पाठीमागचा इतिहास बघितला तर पर्यटन खाते ज्यांच्याकडे असायचे निधी कमी असायचा पण शेवटच्या मार्च एंडला त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात आणि मतदारसंघातच सर्व पैसे जायचे. तुम्ही हे तपासून पाहू शकता. आम्हाला हे कळायचेच नाही हे काय चालले, या पद्धतीच्या घटना घडायच्या, असे पवार म्हणाले. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचे कामे आता पूर्ण झाली आहे. या चिपी विमानतळावर आता एक पुस्तकच लिहायला पाहिजे, किती टर्म चिपी चिपी चालले. पण चिपी काही पूर्ण होईना. दरम्यान, मुंबई ते सिंधदुर्ग विमानसेवा 9 तारखेला सुरू होत आहे. आम्ही पण मुख्यमंत्र्याबरोबर जात आहोत. आताच त्यांना सांगितल विमानात मला जागा ठेवा, अशी मिश्किल टिप्पणी पवारांनी केली.
मंत्रिमंडळाची बैठक ‘डेक्कन ओडिसी’त!
पर्यटन विभागाकडे पूर्वी दुर्दैवाने कुणी लक्ष दिले नव्हते पण आता पुढील काळात आपण या विभागाला महत्त्व देणार आहोत. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक डेक्कन ओडिसी रेल्वेमध्ये घेण्यात येईल. कोरोना काळातही महाराष्ट्राने पर्यटन विकासासाठी केलेल्या भरीव काम केले. जुने ते सोने आहे आणि आपण ते जपतोय पण नवीन सुद्धा निर्माण करण्याची हिम्मत आमच्यात आहे हे दाखवून दिले पाहिजे, असे नमूद करताना महाराष्ट्राचे वैभव जपा आणि वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.
सुरुवातीपासून मी बारकाईने बघतो आहे. निवेदिकेने एवढ्या वेळा मुख्यमंत्र्यांना बसा-उठा करायला लावले. मुख्यमंत्री उठायचे त्यामुळे आम्हाला सुद्धा उठावे लागत होते आणि बसावे लागत होते. एकदाच सांगितले असते तर सर्व संपले असते. पण तुमच्या हातात माईक असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही, अन् मुख्यमंत्र्यांपुढे आमचे काही चालतही नाही.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री