निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्र, टीव्हीवर जाहीर करावा लागणार तपशील

  • या पुढील निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाचे निर्देश
  • या वेळापत्रकामुळे मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकार मिळणार
  • मतदारांना चांगल्या माहितीच्या आधारे उपयोगात आणण्यास मदत होणार

मुंबई : यापुढील कुठल्याही निवडणुकीत (Election) उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना (candidate) किंवा त्यांना तिकिट देणाऱ्या पक्षांना (parties) निवडणुकीच्या काळात तीन वेळा गुन्हेगारीचा तपशील जाहीर करावा लागणार आहे. हा तपशील वृत्तपत्रे (newspapers) आणि दूरचित्रवाहिनीन्यांवर (channels) तीनदा जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना (intimation) राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) आज दिल्या आहेत. बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांनाही हा तपशील जाहीर करावा लागणार आहे.

सुधारीत निर्देशानुसार उमेदवारांनी, तसेच त्यांना नामनिर्देशित केलेल्या राजकीय पक्षांनी संबंधित उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास त्याबाबतचा तपशील वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणीवर प्रसिद्ध करावा लागेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या पहिल्या ४ दिवसांमध्ये पहिल्यांदा ही प्रसिद्धी करावी लागणार आहे, त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेच्या ५ व्या ते ८ व्या दिवसांमध्ये दुसऱ्यांदा प्रसिद्धी करावी लागेल. ९ व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत तिसऱ्यांदा प्रसिद्धी करावी लागेल. हे वेळापत्रक मतदारांना त्यांच्या निवडीचा अधिकार चांगल्या माहितीच्या आधारे उपयोगात आणण्यास मदत करेल.