SEX करु न दिल्याने जबरदस्तीने बलात्कार करुन तोंडवर एसिड फेकल्याचे प्रकरण; आरोपीचा युक्तीवाद ऐकून हाय कोर्टाने नोंदवले महत्वाचे निरीक्षण

मुलीची मुलासोबत जवळीक होती म्हणून त्याला तिच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार करण्याचा परवाना मिळाला असा अर्थ होत नाही. मुळात, लैंगिक अत्याचार ही त्या पिडितेच्या शरीरासोबतच तिच्या आत्म्याला झालेली मोठी इजा असते, असे निरीक्षण नोंदवत लैंगिक अत्याचार करून एसिड फेकणाऱ्या मुंबईतील २६ वर्षीय आरोपीला ठोठावण्यात आलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली(Case of forced rape and throwing acid in the mouth for not having SEX; After hearing the arguments of the accused, the High Court recorded important observations).

    मुंबई : मुलीची मुलासोबत जवळीक होती म्हणून त्याला तिच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार करण्याचा परवाना मिळाला असा अर्थ होत नाही. मुळात, लैंगिक अत्याचार ही त्या पिडितेच्या शरीरासोबतच तिच्या आत्म्याला झालेली मोठी इजा असते, असे निरीक्षण नोंदवत लैंगिक अत्याचार करून एसिड फेकणाऱ्या मुंबईतील २६ वर्षीय आरोपीला ठोठावण्यात आलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली(Case of forced rape and throwing acid in the mouth for not having SEX; After hearing the arguments of the accused, the High Court recorded important observations).

    बोरीवली येथे राहणाऱ्या जितेंद्र सपकाळची १७ वर्षीय पिडितेशी जवळीक निर्माण झाली होती. मात्र, घरच्यांच्या मध्यस्थीनंतर तिने सपकाळपासून दूर राहणे पसंत केले. त्यानंतर त्याने पीडितेला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्याला दोनदा ताकीद देऊन सोडून दिले.

    मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत केलेल्या तक्रारीचा राग मनात ठेऊन एक दिवस जितेंद्रने पीडिता घरी जात असताना तिचे अपहरण करून गोराई बीचवर नेले. तिथे पाशवी कृत्य करून तिच्या चेहऱ्यावर एसिड फेकले. त्यातील काही तिच्या तोंडात गेल्याने पिडिता अनेक महिने बोलू शकत नव्हती. २०१६ मध्ये पोक्सो विशेष न्यायालयाने आरोपीला दोन गुन्ह्यांमध्ये १० वर्षे, तीन गुन्ह्यांसाठी पाच वर्षे आणि दोन गुन्ह्यांसाठी तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाला आरोपीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर नुकतीच न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत सुनावण्यात आलेलेली शिक्षा कायम ठेवली.

    न्यायालयाचे निरीक्षण

    खटल्यातील वस्तुस्थिती लक्षात घेता पीडितेची आरोपीशी सुरुवातीच्या काळात जवळीक होती यात शंका नाही. परंतू याचा अर्थ आऱोपीला पीडितेच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार करण्याचा परवाना मिळाला असा होत नाही. आरोपीने केलेले कृत्य हेतुपुरस्सर आहे. जेणेकरून पिडीतेला त्या त्रासासह आणि वेदनेसोबतच आयुष्य जगणं भाग पडावे. तसेच लैंगिक अत्याचारानंतर पीडितेच्या शारीरिक इजा या भरून निघतात. मात्र, तिच्या आत्म्याला झालेली इजा भरता भरत नाही. कारण, तो तिच्या स्त्रीत्वावरील हल्ला असतो. कोणत्याही प्रकाराची आर्थिक नुकसानभरपाई या पाशवी कृत्यामुळे मिळालेल्या वेदनांचे नुकसान भरून काढू शकत नाही. हा पिडितेच्या मनावरील ओरखडा असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने यावेळी नोंदवले.

    सरकारच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त

    आरोपीने केलेल्या पाशवी कृत्याबाबत ठोठावण्यात आलेल्या शिक्षेमध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारने कोणताही अर्ज दाखल का केला नाही, असा सवाल उपस्थित करत न्यायालयाने आश्चर्यही व्यक्त केले.

    नुकसानभरपाईसाठी पात्र

    आरोपीला ठोठावण्यात आलेला दंड हा त्याने केलेल्या गुन्ह्यांसमोर नगण्य आहे. दुसरीकडे, पीडिता एसिड हल्याने ग्रस्त आहे. त्यामुळे तिला वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळावे आणि तिच्या वडिलांना दिलासा मिळावा त्यासाठी मिळणाऱ्या नुकसानभरपाईसाठीही ती पात्र असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले.