नायर रुग्णालयात सहा महिन्याच्या बालकाचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण; ११ भाजप नगरसेवकांचे आरोग्य समिती सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे

नायर रुग्णालयात सहा महिन्याच्या बालकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ ११ भाजप नगरसेवकांनी आरोग्य समिती सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिका चिटणीस विभागाने येत्या गुरुवारी होणा-या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना तातडीने मंजुरी देण्याची शक्यता आहे(Case of negligent death of a six-month-old baby at Nair Hospital; Collective resignations of 11 BJP corporators for health committee membership).

    मुंबई : नायर रुग्णालयात सहा महिन्याच्या बालकाच्या मृत्यूच्या निषेधार्थ ११ भाजप नगरसेवकांनी आरोग्य समिती सदस्यपदाचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिका चिटणीस विभागाने येत्या गुरुवारी होणा-या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेना तातडीने मंजुरी देण्याची शक्यता आहे(Case of negligent death of a six-month-old baby at Nair Hospital; Collective resignations of 11 BJP corporators for health committee membership).

    नायरमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वरळी बीडीडी चाळीतील भाजलेल्या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद आरोग्य समितीत उमटले होते. या घटनेच्या विरोधात सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या आरोग्य समितीतील सर्व ११ सदस्यांनी तातडीने राजीनामा दिला.

    भाजप नगरसेवकांनी दिलेल्या राजीनाम्याचे रीतसर प्रस्ताव चिटणीस विभागाने आरोग्य समितीच्या मंजुरीसाठी ठेवले आहेत. राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये प्रकाश मोरे, सुनीता मेहता, अनिता पांचाळ, नील सोमय्या, योगिता कोळी, हर्षिता नार्वेकर, सारिका पवार, बिना जोशी, प्रियंका मोरे, बिंदु त्रिवेदी व राजुल देसाई यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या समितीच्या बैठकीत हे राजीनामे मंजूर केले जाणार असल्याचे समजते.