corona in dharavi

मागील दोन वर्ष कालावधीत मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असून गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंद होत आहे. असे असले तरी मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. बाहेरगावाहून मुंबईत येणा-यांवर पालिका लक्ष ठेऊन आहे. बंद असलेल्या घरामध्ये कोणी आल्यास त्याची माहिती महापालिका घेत आहे(Caution not to overcook the controlled corona; BMC's watch on closed houses in Mumbai).

    मुंबई : मागील दोन वर्ष कालावधीत मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असून गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंद होत आहे. असे असले तरी मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. बाहेरगावाहून मुंबईत येणा-यांवर पालिका लक्ष ठेऊन आहे. बंद असलेल्या घरामध्ये कोणी आल्यास त्याची माहिती महापालिका घेत आहे(Caution not to overcook the controlled corona; BMC’s watch on closed houses in Mumbai).

    यामध्ये कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची माहिती गोळा केली जात आहे, अशी माहिती पालिकेच्या अधिका-याने दिली. मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर संपूर्ण मुंबईत कोरोना झपाट्याने वाढला. कोरोनाच्य़ा पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. पहिली लाट नियंत्रणात आल्य़ानंतर एप्रिल २०२१ मध्ये दुसरी तर डिसेंबर २०२१ ला तिसरी लाट आली. पहिल्या लाटेदरम्यान सर्वाधिक २८००, दुसऱ्या लाटेदरम्यान ११ हजार तर तिसऱ्या लाटेदरम्यान २० हजार रुग्णांची नोंद झाली.

    झपाट्याने वाढलेल्या रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला. मात्र लसीकरण, नियमाची कडक अमलबजावणी आणि प्रभावी उपायय़ोजनांमुळे कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आले. जानेवारीपासून कोरोनाचा प्रसार कमी होऊ लागला. गेल्या दोन महिन्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या रोज ५० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या दोन वर्षातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

    परराज्यातून मुंबईत परतणा-यांवर लक्ष

    मुंबईत आढळून येणारे रुग्ण हे स्थानिक नसून ते मुंबईबाहेरून येणारे रुग्ण आहेत. सध्या ५ राज्यातील निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे विविध राज्यातील नागरिक मुंबईत परतत आहेत. या नागरिकांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने पालिका सतर्क झाली आहे. जी घरे बंद आहेत त्या घरामध्ये कोणी बाहेरगावाहून आल्यास त्याची माहिती पालिका घेत आहे. कोरोनाची लक्षणे असल्यास त्याची माहिती गोळा केली जात आहे. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार करून कोरोना रोखण्याचे नियोजन पालिकेने केले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.