प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

काेराेना वैक्सीनबाबत मुस्लीम समाजात विविध चर्चा हाेत आहेत. बुधवारी याच संदर्भात सुन्नी मुस्लीम धर्मगुरुची मुंबईत एक विशेष बैठक झाली. येत्या काही  दिवसात मुंबईत काेराेना लसीकरणाला सुरुवात हाेणार आहे, परंतु या वैक्सीनमध्ये काय-काय घटक समािवष्ट केले आहेत, याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य सरकारनेे मुस्लिम धर्मगुरुंना द्यावी, त्यानंतरच लसीकरणाकरीता मुस्लीम समाजाकडून सहभाग नाेंदिवण्यात येईल, असे आज झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

  • मुस्लिम नऊ संघटनांची तातडीची बैठक
  • सांगा ! वैक्सीनमध्ये काय-काय घटक आहेत ?

नीता परब
मुंबई (Mumbai).  काेराेना वैक्सीनबाबत मुस्लीम समाजात विविध चर्चा हाेत आहेत. बुधवारी याच संदर्भात सुन्नी मुस्लीम धर्मगुरुची मुंबईत एक विशेष बैठक झाली. येत्या काही  दिवसात मुंबईत काेराेना लसीकरणाला सुरुवात हाेणार आहे, परंतु या वैक्सीनमध्ये काय-काय घटक समािवष्ट केले आहेत, याची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्य सरकारनेे मुस्लिम धर्मगुरुंना द्यावी, त्यानंतरच लसीकरणाकरीता मुस्लीम समाजाकडून सहभाग नाेंदिवण्यात येईल, असे आज झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील नऊ महिन्यांपासून काेराेना व्हायरस जगभरात थैमान घातले आहे. भारतात या व्हायरसमुळे आतापर्यंत एक कराेडपेक्षाही अधिक नागरिक संक्रमित झाले आहेत. याशिवाय लाखाे लाेकांचा मृत्यू झाला आहे. आता संपूर्ण जग काेराेना लसीची आतुरतेने वाट पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत देखील सध्या नायर, केईएम, सायन, जेजे या रुग्णालयात काेराेना वैक्सीनचे ट्रायल सुरु आहे. ज्यामुळे येत्या काही महिन्यात प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात हाेईल.

दुसरीकडे, मात्र मुस्लीम समाजाकडून या वैक्सीनबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यानच्या, काळात वैक्सीनबाबत साेशल मिडीयावर दिशाभूल करणारे व्हिडिओ वायरल झाले हाेते. ज्यामुळे, मुस्लीम समाजामध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. परिणामी, मुस्लीम समाजाने या वैक्सीनबाबत आवाज उठविला असून बुधवारी याचबाबत मुंबईतील नऊ मुस्लीम संघटनांनी मुंबई स्थित बिलाल मस्जिदमध्ये काेराेना वैक्सीनबाबत एक बैठक घेतली हाेती. या बैठकीत वैक्सीनबाबत चर्चा करण्यात आली, या बैठकीत मुंबईतील विविध मस्जिदमधील धर्मगुरुंचा सहभाग हाेता, शिवाय इतरही १०० ते १५० नागरिक हजर हाेते.

याबाबत मुफ्ती माेहम्मद मंजर हसन अशरफी यांनी सांगितले की, ‘‘येत्या काही महिन्यात दिलेल्या जाणाऱ्या वैक्सीनमध्ये काय-काय घटकांचा सहभाग आहे. याबाबत आम्हाला माहिती द्यावी, बार काेड मध्ये याबाबतची माहिती मिळते. पण तरीही राज्य सरकारने आम्हांला याबाबत माहिती द्यावी, असे आम्हांला अपेक्षित आहे. शिवाय राज्य वरिष्ठ डाॅक्टरांबराेबर बैठकही आम्ही घेणार आहाेत. तसेच आज झालेल्या या बैठकीबाबत राज्य आराेग्य विभागाला पत्र लिहून माहितीही देणार आहेत.

या बैठकीत ऑल इंडिया सुन्नी जमीयतुल उलेमा, रजा अकेडमी, जामिया कादरिया अशरफिया, जमाते उलेमा अहले सुन्नत, अंजुमन बरकाते रजा, दारुल उलूम हंफिया रजविया, दारुल उलूम फैजाने मुक्ती-ए-आजम, तंजीम आईन मई मसजिद, ऑल इंडिया मसाजिद कांउसिल या नऊ संघटनांनी सहभाग घेतला हाेता.