एकदा कोरोना होऊन गेला की शरीरात अँटीबॉडीज तयार होतात; पण त्या…

नोव्हेल कोरोना व्हायरस विषयी  ब-याच गोष्टी संशोधनातून माहिती होत असून  कोविड-१९ मधून ब-या झालेल्या व्यक्तींना या विषाणूचा   पुनःसंसर्ग   होण्याची  शंका  अनेकांच्या मनात घोळत असताना,  संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली अँटीबॉडीज त्या व्यक्तीला संरक्षण पुरवू शकतात का? आणि पुरवत असतीलच तर त्या किती काळापर्यंत प्रभावी राहतात अशा अँटीबॉडीज पुनर्संसर्गाशी सामना करण्याइतक्या शक्तिशाली असतात का या विषयावर अजूनही खूप संशोधन होण्याची गरज असल्याचे मत संसर्गजन्य आजार विशेषज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : नोव्हेल कोरोना व्हायरस विषयी  ब-याच गोष्टी संशोधनातून माहिती होत असून  कोविड-१९ मधून ब-या झालेल्या व्यक्तींना या विषाणूचा   पुनःसंसर्ग   होण्याची  शंका  अनेकांच्या मनात घोळत असताना,  संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरात तयार झालेली अँटीबॉडीज त्या व्यक्तीला संरक्षण पुरवू शकतात का? आणि पुरवत असतीलच तर त्या किती काळापर्यंत प्रभावी राहतात अशा अँटीबॉडीज पुनर्संसर्गाशी सामना करण्याइतक्या शक्तिशाली असतात का या विषयावर अजूनही खूप संशोधन होण्याची गरज असल्याचे मत संसर्गजन्य आजार विशेषज्ज्ञ डॉ. अनिता मॅथ्यू यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. मॅथ्यू यांनी सांगितले की,  जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)ने सांगितल्याप्रमाणे अँटीबॉडीज हा काही आपला इम्युनिटी पासपोर्ट नाही. अँटीबॉडीजचे आयुर्मान आणि त्याची ताकद यांचा सखोल अभ्यास होण्याची गरज जगभरातील संशोधक सातत्याने मांडत आहेत. त्यासाठी नजिकच्या काळात कोविड-१९ होऊन गेलेल्या व्यक्तींबाबत अधिक माहिती घेण्याबाबत अनेक महिन्यांपासून सुरुवात झाली आहे.

आपल्याकडे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडून कोविड-१९ वर उपचार घेतलेल्या व्यक्तींमधील पुनःसंसर्गच्या प्रकरणांचा अभ्यास केला जात आहे. आकडेवारीवर आधारित अधिकाधिक तथ्ये अजून आपल्या हाताशी लागायची आहेत, पण दरम्यानच्या काळात अँटीबॉडीजना गृहित धरून चालणार नाही. कोविड-१९ च्या पुनर्संसर्गाला विरोध करण्याच्या आपल्या अँटीबॉडीजच्या क्षमतेविषयी प्रत्यक्ष माहितीवर आधारित काही खराखुरा निष्कर्ष काढणे शक्य नाही इतके तर आता स्पष्ट झाले आहे.

लसीकरण कार्यक्रम कशाप्रकारे पुढे जाईल, आपल्यापैकी किती जणांनी किती लवकरात लवकर लस मिळेल आणि लस टोचून घेणे महत्त्वाचे का आहे या गोष्टींकडे बारकाईने पाहण्याची गरज आहे.  नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कोविड-१९ लसीची वाट पाहत असताना, आपण स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबियांच्या  सुरक्षिततेची खबरदारी घेत राहू या.  लस तुमच्यापर्यंत पोहोचायला अजून काही महिने जातील. तेव्हा सुरक्षित रहा, सकारात्मक रहा आणि तुम्हाला याआधी कोविड-१९ ची बाधा झाली असली तरीही अँटीबॉडीजना गृहित धरून त्यांच्यावर विसंबून राहू नका असे मत डॉ. अनिता मॅथ्यू यांनी व्यक्त केले.