केंद्र सरकारने ७५ टक्के लस द्यावी; हसन मुश्रीफ यांची मागणी

लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढल्या होत्या, पण केंद्र सरकारने लस कंपन्यांना राज्य सरकारबरोबर लसीच्या बाबतीत चर्चा करू नका असे सांगत आम्हाला ७५ टक्के लस द्यावी अशी मागणी केली. लसीचे दोन्ही डोस घेतलेले देश आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारला आमची विनंती आहे की या जुलैपासून लसीचे डोस वाढवा. असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

    कोल्हापूर : लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने निविदा काढल्या होत्या, पण केंद्र सरकारने लस कंपन्यांना राज्य सरकारबरोबर लसीच्या बाबतीत चर्चा करू नका असे सांगत आम्हाला ७५ टक्के लस द्यावी अशी मागणी केली. लसीचे दोन्ही डोस घेतलेले देश आता पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारला आमची विनंती आहे की या जुलैपासून लसीचे डोस वाढवा. असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

    लस देण्याची केंद्राची जबाबदारी असल्याचे संपूर्ण देश सांगत होता, सर्वोच्च न्यायालय देखील सांगत होते. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दिदींनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी लस विकत घेतली आणि त्यावर स्वतःचा फोटो छापला. ममता दीदीच्या या कृतीची मोदी साहेबांवर अधिक छाप पडली आणि त्यानंतर संपूर्ण देशात मोफत लसीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यामुळे मला ममता दीदीचे आभार मानायला हवेत
    असे म्हणत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.