नेहमी करा योग, तुमच्या जवळ येणार नाही रोग… – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आठवलेंनी दिल्या आपल्या खास शैलीत शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त(Internationa Yoga Day 2021) रामदास आठवले(Ramdas Athavale) यांनी आपल्या खास शैलीत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले(Ramdas Athavale) हे त्यांच्या खास काव्यात्म शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या यमक जुळवून कविता करण्याच्या सवयीचे अनेकजण फॅन आहेत. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त(Internationa Yoga Day 2021) रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  नेहमी करा योग,
  तुमच्या जवळ येणार नाही रोग
  नेहमी करा योग,
  निघून जाईल तुमचा रोग

  असे म्हणत आपल्या खास काव्यमय शैलीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आठवलेंनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नियमित योगासने करण्याचे आवाहन केले आहे.

  मनाच्या एकाग्रतेसाठी योगाची नितांत आवश्यकता आहे. योग केल्यामुळे आयुष्य वाढते त्यामुळे नियमित योग करावा. मी सुद्धा रोज कपालभाती हा योग प्रकार करीत असतो. योग ही जगाला भारत देशाने दिलेली महान देणगी आहे. अडीज हजार वर्षा पूर्वी भगवान बुद्धांनी भारतात सर्वप्रथम विपश्यना( मेडिटेशन )ची महान विद्या जगाला दिली याचा आम्हाला अभिमान आहे, असे रामदास आठवले म्हणाले.