राज्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता – हवामान विभाग

मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे ३ दिवस काही ठिकाणी विजेच्या कडकटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल, तसेच शुक्रवारी राज्यात जोरदार पाऊस होईल असं प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईतील शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे.

    मुंबई : राज्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पावसाची अंदाज प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यात मुंबई, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे आता राज्यात पुढील दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. शुक्रवारी म्हणजे २४ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

    मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे ३ दिवस काही ठिकाणी विजेच्या कडकटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात याचा प्रभाव असेल, तसेच शुक्रवारी राज्यात जोरदार पाऊस होईल असं प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईतील शुभांगी भुते यांनी सांगितलं आहे.

    मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन ते चार दिवसात असल्याचं सांगण्यात आलं आहे. याशिवाय कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पाऊस पडणार असल्यानं नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या शक्यतेनुसार पाऊस पडला तर नागरिकांनी विनाकरण बाहेर पडू नये, असंही त्यांनी सांगितलं आहे.