राज्यातील ”या” भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा पुणे गोवा पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

    मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा पुणे गोवा पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही.

    मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    दरम्यान गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर गेली असून तिची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीचे पाणी आता आजूबाजूच्या शेतात पसरायला सुरुवात झाली आहे.