परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआयही येणार, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान

पंढरपूर येथे चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक आणि मोठं विधान केलं. परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआय येणार. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, असं पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला लगावला. आम्ही रात्री अथवा दिवसा सत्तांतराची स्वप्ने पाहात नाही. सक्षम विरोधी पक्ष म्हणून रोज रस्त्यावर उतरतो, असं सांगतानाच सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असंही ते म्हणाले.

    पंढरपूर: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात आता ईडी आणि सीबीआयही येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो, असं विधानही त्यांनी केलं आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.