
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रच नाही तर जगभरातील अनुयायी दादरमधील(Dadar) चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona Restrictions On Chaityabhoomi)मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र यावरुन चैत्यभूमीवर नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ(Chaos In Chaityabhoomi) घातला.
मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा(Doctor Babasaheb Ambedkar) आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रच नाही तर जगभरातील अनुयायी दादरमधील(Dadar) चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona Restrictions On Chaityabhoomi)मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र यावरुन चैत्यभूमीवर नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ(Chaos In Chaityabhoomi) घातला. काही वेळासाठी याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
अनेक अनुयायी आदल्या दिवशीच दादरमध्ये येतात. मात्र यावेळी कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने संतप्त अनुयायांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासाठी आत प्रवेश दिला जात नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेत आहेत, त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेदेखील त्यापद्धतीने दर्शन घेत आहेत. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी बॅरिगेट्स तोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही खाली पाडण्यात आले. यानंतर काही अनुयायांमध्येच तसंच पोलिसांसोबत झटापट झाली. मात्र काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान हे तरुण केवळ स्टंटबाजी करत असल्याचं तेथील आयोजनकर्त्यांचं म्हणणं आहे.