सुशोभिकरण करताना या तलावातील निर्माण होणारी जलपर्णी ही पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने जलपर्णी हटविण्यासाठी ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रासायनिक औषधांचा वापर केला. त्यामुळे तलावातील मासे, मगरी यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला.
मुंबई : पवई तलावातील जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक फवारणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत मुंबई महापालिकेच्या ‘एस’वार्डच्या सहाय्यक आयुक्तांना नोटीस बजावत यापुढे रासायनिक फवारणी करण्यास मनाई केली आहे.
मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पवई तलावाच्या सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे.
सुशोभिकरण करताना या तलावातील निर्माण होणारी जलपर्णी ही पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने जलपर्णी हटविण्यासाठी ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रासायनिक औषधांचा वापर केला. त्यामुळे तलावातील मासे, मगरी यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते डी. स्टॅलिन यांनी १४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ऑनलाईन तक्रार केली होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पवई तलावाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर, १६ सप्टेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेच्या ‘एस’ वार्डचे सहाय्यक आयुक्त यांना तातडीने नोटीस बजावून तलावात रासायनिक फवारणी करण्यास मनाई आदेश जारी केले. या नोटिशीत रासायनिक फवारणीमुळे जलचर पर्यावरणावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.