महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ पुन्हा अडचणीत! निर्दोष मुक्ततेला आव्हान

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयविरोधात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान कोरोनामुळे उच्च न्यायालयात तातडीच्या याचिकेंवरच सुनावणी होत असल्याने या याचिकेवर सुनावणीसाठी महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे(Chhagan Bhujbal in trouble again in Maharashtra Sadan scam case! Challenging Innocent Freedom).

  मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयविरोधात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान कोरोनामुळे उच्च न्यायालयात तातडीच्या याचिकेंवरच सुनावणी होत असल्याने या याचिकेवर सुनावणीसाठी महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे भुजबळ यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे(Chhagan Bhujbal in trouble again in Maharashtra Sadan scam case! Challenging Innocent Freedom).

  निर्दोष मुक्ततेचा निकाल

  महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी 9 सप्टेंबरला भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. याप्रकरणी भुजबळ यांना दोन वर्षांची शिक्षादेखील झाली होती.

  लाचखोरीचा आरोप

  भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळात जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयानेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

   

  हे सुद्धा वाचा
  • 2022