चिकन 10 रुपयांनी तर अंडी एक रुपयांनी महागली, आजचे दर किती? : जाणून घ्या एका क्लिकवर

श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच खवय्यांना महागाईचा तडाका बसला आहे. खवय्यांनी मांसहार सुरू केल्याने अंडी आणि चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

    मुंबई : श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच खवय्यांना महागाईचा तडाका बसला आहे. खवय्यांनी मांसहार सुरू केल्याने अंडी आणि चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चिकनच्या दरात 10 तर अंडी एक रुपयांनी महागले आहे.

    श्रावण महिन्यातील उपवास आणि गणेशोत्सवाचा काळ संपताच चिकन आणि अंड्यांचे भाव वधारले आहेत. सोयाबीन आणि मका महागल्याने मासांहार सेवनाकडे वळल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांत कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. ब्रॉयलर आणि गावठी कोंबडीच्या दरात प्रति किलोमागे 10 रुपयांनी तर, अंड्याच्या दरात प्रति नग 1 रुपयाने वाढ झाली आहे.

    आताचे दर किती?

    ब्रॉयलर कोंबडी आधी 120 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 430 रुपये प्रति किलोने आणि अंडी प्रति नग पाच रुपये दराने विक्री केले जात होते. आता ब्रॉयलर कोंबडी 140 ते 150 रुपये प्रति किलोने, गावठी कोंबडी 440 ते 460 रुपये प्रति किलोने तसेच अंडी प्रति नग 6 रुपये दराने विक्री केले जात आहेत.