प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या शंभर सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यानी स्थगिती दिल्यानंतर त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या, १५ मिनिटात बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय(Flats For Cancer patients) घेण्यात आला आहे.

    मुंबई : कॅन्सर हॉस्पिटलला दिलेल्या सदनिकांना निर्णय(Flats For Cancer Patients) स्थगित केल्यानंतर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सत्तासंघर्ष सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. सर्वसामान्य नागरिकांकडूनही या स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून(Chief Minister Decision) आज याबाबत फेर विचार करण्यात आला.

    १५ मिनिटात बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका
    गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या शंभर सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यानी स्थगिती दिल्यानंतर त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या, १५ मिनिटात बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय(Flats For Cancer patients) घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर २४ तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, काल मिळालेल्या स्थगितीला आज तेवढ्याच जागा, त्याच परिसरात देऊ शकलो, असेही आव्हाड यांनी सांगितले.

    रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय
    राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या १00 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. १६ मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.