मुख्यमंत्र्याना क्षणभरही त्या पदावर राहण्याच अधिकार नाही : खा राणे यांचा प्रहार!

  वर्षा बंगल्यावर कुणाला भेटला होता? कुठल्या हॉटेलमध्ये राहात होता याची माहिती घेतली पाहीजे वाझे ज्यांना काल पर्यंत लादेन नाही संत आहे असे वाटले होते ते मुख्यमंत्री त्याची वकीली करत का होते ते समोर आले आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहीजे. मुख्यमंत्र्याना क्षणभरही त्या पदावर राहण्याच अधिकार नाही असे ते म्हणाले.

  मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी परमवीर सिंग यांच्या पत्रानंतर गृहमंत्र्याप्रमाणेच मुख्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की वाझे यांना सेवेत घेण्यासाठी ठाकरे यांनी शिफारस केली होती, त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांना महत्वाच्या पदावर नियुक्ती मिळाली होती.
   
  मुख्यमंत्र्याना गांभीर्यच नाही

  माजी मुख्यमंत्री राणे म्हणाले की, गृहमंत्र्याना पत्र देण्याचे धाडस जेंव्हा एखादा सेवेत असणारा अधिकारी करतो त्यावेळी त्यात तथ्य असल्याशिवाय तो असे आरोप करू शकत नाही. मात्र मुख्यमंत्र्यानी याबाबत काहीच गांभीर्य न दाखवता साधी चौकशी करण्याची घोषणा देखील केली नाही. ते म्हणाले की कुणामुळे वाझे याला क्रिम पोस्टींग मिळाली तो कुणासोबत कुठे राहत होता?

  वर्षा बंगल्यावर कुणाला भेटला