मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रिलायन्स रुग्णालयात ; नियमीत आरोग्य तपासणीनंतर घरी परतले !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर २०१२ मध्ये लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर ते नियमित आरोग्य तपासणीसाठी ते लिलावती रुग्णालयातच जातात. मात्र, मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकदा 'वर्षा' निवासस्थानी त्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे यावेळी त्यांनी रिलायन्स रुग्णालयात जाणे पसंत केले.  गेल्या दिड वर्षापासून उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. 

    मुंबई : गेल्या दिड-पावणेदोन वर्षापासून कोरोना विषाणूपासून राज्यातील जनतेची काळजी वाहणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सकाळीच एचएन रिलायन्स रूग्णालयात नेहमीप्रमाणे स्वत:च कार चालवत दाखल झाले. नियमीत आरोग्य तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते. तासाभराच्या तपासणीनंतर ते पुन्हा रुग्णालयातून घरी परतले. त्यावेळी रूग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

    आरोग्याच्या सेवेसाठी वर्क फ्रॉम होम

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर २०१२ मध्ये लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर ते नियमित आरोग्य तपासणीसाठी ते लिलावती रुग्णालयातच जातात. मात्र, मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकदा ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे यावेळी त्यांनी रिलायन्स रुग्णालयात जाणे पसंत केले.  गेल्या दिड वर्षापासून उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. याशिवाय राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणातही सक्रीय असतात. कोविड-१९ च्या काळात त्यांनी राज्यातील आरोग्याच्या सेवेसाठी वर्क फ्रॉम होम करत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. यावरून विरोधकांच्या टिकेचाही सामना त्यांना नेहमी करावा लागतो.

    कोरोनाकाळात राज्याच्या सेवेत कार्यरत

    अधिकाऱ्यांच्या दूरदृश्य माध्यमांतून बैठका मंत्र्यांशी समन्वय साधत त्यांनी स्वत: करोनाशी लढताना राज्यातील विकासाच्या कामांकडेही लक्ष देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. एच एन रिलायन्स हे रुग्णालय मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाच्या जवळच आहे. त्यापूर्वी काही दिवस आधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू होते.