खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलवली महत्वाची बैठक

    “मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. खड्ड्यांमुळं अनेकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यातच आता राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं नागरिकांसह मंत्र्यांनाही त्रास होऊ लागल्यानं त्याचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. रस्ते खड्डेमय झाल्यानं नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असून, केवळ अधिकाऱ्यांवर तात्कालिक कारवाई करून भागणार नाही, तर रस्त्यांच्या दर्जाबाबत जबाबदारी निश्चित करावी लागेल अशी भावना अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली. त्यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील खड्डय़ांच्या प्रश्नावर बुधवारी बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.

    “नाशिकहून मुंबईला येताना खड्ड्यांचा कसा त्रास झाला व प्रवासामध्ये किती वेळ गेला याची हकीकत छगन भुजबळ यांनी ऐकवली. तसंच, या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी ठाणे परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेची माहिती देत ४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याचं सांगितलं. तसंच, निलंबनानं हा प्रश्न सुटणार नाही याबाबत ठोस उपाययोजना करावी लागणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.