Chief Minister Uddhav Thackeray does not give time; Raju Shetty, who supported the Mahavikas Aghadi government, got angry and ...

राजू शेट्टी यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी मागण्यांचे निवेदन अजित पवार यांना देण्यात आले. केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आजची भेट असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. या कायद्यावर महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राजू शेट्टी यानी अजित पवार यांच्याकडे केली. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेवेळी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिले.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत मुख्यमंत्री वेळ देत नसल्याची तक्रार केली आहे.

    मागण्यांवर चर्चा घडविण्याचे आश्वासन

    केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना महाविकास आघाडीच्या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शेट्टी यांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी राजू शेट्टी यांनी पवारांकडे मुख्यमंत्र्यांची तक्रार केली की मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाहीत. त्यांनी सांगितले की, नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलेही उत्तर आले नाही. त्यावर पवार यांनी याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन दिले.

    शरद पवार यांचे ट्विट

    दरम्यान, शरद पवार यांनी व्टिट करत आज श्रीमती मेधा पाटकर, राजू शेट्टी यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मत मांडले, तसेच राज्यशासनाने याबाबतीत ठोस भूमिका मांडावी असा आग्रह धरला. मा. मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन विविध संघटनांच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन त्यांना दिले, अशी माहिती दिली आहे.

    सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे

    दरम्यान, राजू शेट्टी यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. त्यावेळी मागण्यांचे निवेदन अजित पवार यांना देण्यात आले. केंद्रीय कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी बांधवांच्या भावना राज्य सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी आजची भेट असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. या कायद्यावर महाविकास आघाडी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राजू शेट्टी यानी अजित पवार यांच्याकडे केली. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते आणि हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या बाजूनेच उभे राहील. शेतकरी हिताचे पाऊल उचलण्यात सरकार मागे हटणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेवेळी शिष्टमंडळाच्या नेत्यांना दिले.

    यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, प्रतिभा शिंदे, एस. व्ही. जाधव, अशोक ढवळे, नामदेव गावडे, सुभाष लोमटे, किशोर ढमाले, सीमा कुलकर्णी, सुभाष काकस्ते, उमेश देशमुख, शकील अस्मेद आदी मान्यवर होते.