मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने आज मंगळवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई (Mumbai).  संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने आज मंगळवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गुरू मानले. त्यामुळेच तुकोबारायांची गाथा आज आपल्या पर्यंत पोहचली. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा पाया घातला आणि तुकोबारायांनी कळस रचला असे म्हटले जाते. मराठी साहित्यासाठी तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अनमोल ठेवा आहे. त्यांचे असे अनेक अभंग संत जगनाडे महाराजांनी लिहून ठेवल्यामुळे मराठी आणखी समृद्ध झाली.त्यांनी स्वत:ही उद्बोधक अशा अनेक रचना लिहिल्या. संत जगनाडे महाराजांचे हे योगदान अपूर्व असेच आहे.