मुख्यमंत्र्यांनी केले नवाब मलिकांचे कौतुक; म्हणाले, ‘गुड गोईंग…’

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कौतुक (CM Thackeray Praises Malik) केले आहे. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत 'गुड गोईंग' अशा शब्दांत त्यांनी मलिकांचे कौतुक केले.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कौतुक (CM Thackeray Praises Malik) केले आहे. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत ‘गुड गोईंग’ अशा शब्दांत त्यांनी मलिकांचे कौतुक केले. नवाब मलिक यांनी घेतलेली भूमिका पुढे सुरु ठेवावी, हे प्रकरण सुरु ठेवा आणि शेवटापर्यंत घेऊन जा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

    नवाब मलिकांच्या लढ्याला राज्य मंत्रिमंडळाने पाठिंबा दर्शवला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी मलिकांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केल्य़ाची माहिती आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर, नवाब मलिक सातत्याने एनसीबी आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आर्यनची अटक नव्हे तर त्याचे अपहरण करण्य़ात आले आणि मोठी खंडणी वसुलीसाठी हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप मलिकांनी केला होता.

    तसेच समीर वानखेडे यांनी खोटे जात पडताळणी प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवली, वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. इतकेच नव्हे तर फडणवीस हे ड्रग्ज माफियांशी संबंधित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस विरुद्ध मलिक हा संघर्ष राजकीय वर्तुळात चर्चिला जातो आहे.

    दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी काही दिवसांपूर्वी शरद पावरांचीही भेट घेतली होती. त्या भेटीतही पवारांनी हे प्रकरण शेवटापर्यंत न्या, असे मलिकांना सांगितले होते. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानेही पाठिंबा देत मलिक हे एकटे नाहीत, हे दाखवून दिले आहे.