अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प(budget) मांडला. अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(chief minister uddhav thakre reaction over budget) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बजेट देशासाठी पाहिजे निवडणुकांसाठी नको. हा देशाचा अर्थसंकल्प आहे निवडणुकांचा नाही. थोडासा अवधी घेऊन मी अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार आहे.

पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडील राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात त्या राज्यांसाठी तरतूद करण्यात आली आहे. असे अनेकांचे मत आहे. उद्धव ठाकरेंनीही आपल्या प्रतिक्रियेमध्ये तसेच म्हटले आहे.
खासदार संजय राऊत यांनीही या अर्थसंकल्पाला निवडणुकीसाठीच निधी वाटप असल्याचं म्हटलं आहे.