उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मागील काही महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत, यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर उपासमारीचे वेळ आली असल्यामुळं, मागील काही दिवसांपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह पुन्हा सुरु करावी यासाठी रंगकर्मी, निर्माते, आणि कलाकार यांनी आंदोलन सुद्धा केले होते. या सर्व धरतीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित मान्यवरांची मतं जाणून घेण्यात आली. तसेच राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह ही आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटलेय.

    मुंबई : राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. असंं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

    आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत  राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. तसेच आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर ही परवानगी देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.

    मागील काही महिन्यांपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत, यामुळं या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर उपासमारीचे वेळ आली असल्यामुळं, मागील काही दिवसांपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह पुन्हा सुरु करावी यासाठी रंगकर्मी, निर्माते, आणि कलाकार यांनी आंदोलन सुद्धा केले होते. या सर्व धरतीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित मान्यवरांची मतं जाणून घेण्यात आली. तसेच राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह ही आरोग्याचे नियम पाळण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटलेय.

    आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत , खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.