उद्यापासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होणार, जाणून घ्या काय आहे नियमावली?

गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज उद्यापासून कानात घुमणार आहे. राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील शासनाने परवानगी दिली आहे. नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत.

  मुंबई : मागील दिड वर्षापासून कोरोनामुळं चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद आहेत. तसेच गेले अनेक दिवस सिने-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा सिने-नाट्यवर्तुळात होत होती. सिनेमाप्रेमीदेखील कधी सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसऱ्या घंटेचा आवाज उद्यापासून कानात घुमणार आहे. राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास देखील शासनाने परवानगी दिली आहे. नाट्यगृह पन्नास टक्के क्षमतेनं सुरु होणार आहेत, त्यानुसार उद्या म्हणजे २२ ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होत आहेत.

  काय आहेत नियमावली?

  राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळं चित्रपटगृह, नाट्यगृह यांना राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळं उदयापासून चित्रपटगृहात गाण्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज, तसेच नाट्यगृहात तिसऱ्या घंटेचा आवाज नाट्यरसिकांना ऐकायला मिळणार आहे. जरी उद्यापासून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होत असले तरी, शासनाने काही नियमावली आखून दिल्या आहेत, त्याचे पालन करणे गरजेचं आहे असं शासनाने म्हटलं आहे.

  -सोशल डिस्टन्सिंग आवश्यक

  -प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क अनिवार्य

  -चित्रपटगृहातील वारंवार निर्जंतुकीकरण

  -नाट्यगृहातील वारंवार निर्जंतुकीकरण

  -कलाकार, पडद्यामागचे कलाकार, रंगकर्मी यांचे लसीकरण

  -नाट्यगृहाची पन्नास टक्के क्षमता

  -नाट्यगृहातील एका सीटनंतर दुसरी सीट रिकामी

  -वरील नियमांचे पालन करणे गरजेचं

  -कोरोनाचे रुग्ण जास्त आढळल्यास पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

  हे चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

  अनेक हिंदी चित्रपट निर्मात्यांनी आपल्या प्रलंबित पिक्चरची थेटरमधली तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे पुढचा काही काळ लॉकडाउनमुळे घरात अडकून राहिलेल्या सिने रसिकांची चांगलीच चंगळ असणार आहे. तसेच काही मराठी चित्रपट सुद्धा पुढील काळात येणार आहेत, जाणून घ्या कोणते चित्रपट येणार आहेत प्रेक्षकांच्या भेटीला…

  १) २९ ऑक्टोबर – सूर्यवंशी (अक्षय कुमार)

  २) १९ नोव्हेंबर – बंटी और बबली २ (सैफ अली खान)

  ३) ३ डिसेंबर – तडप (अहान शेट्टीचा पहिला चित्रपट)

  ४) २४ डिसेंबर – १९८३ वर्ल्डकप (रणवीर सिंग)

  ५) २१ जानेवारी – पृथ्वीराज (YRF – अक्षयकुमार)

  ६) १४ फेब्रुवारी – लालसिंग चड्ढा (आमिर खान)

  ७) २५ फेब्रुवारी – जयेश भाई जोरदार (रणवीर सिंग)

  ८) ४ मार्च – बच्चन पांडे

  ९) १८ मार्च – शमशेरा (YRF – रणबीर कपूर)

  १०) ६ मे – हिरोपंती २