प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

दररोज मुंबईला या भागातून तीन ते चार हजार प्रवासी रोजी रोटी, शिक्षणासाठी ये जा करतात. तर या परिसरात मुंबईतील अनेकांची सेंकड होम आहेत, सुटीच्या काळात निवासासाठी विकेंडला या भागात शुक्रवार ते रविवार सोमवार या दिवशी आठ ते दहा हजार प्रवासी जलमार्गाने प्रवास करतात.

    मुंबई : राज्यातील एस टी कामगारांचा संप (ST Workers Strike) सुरू असल्याने ग्रामिण भागातील जनतेला प्रवासाकरिता (Travel) प्रचंड त्रास (Huge Trouble) सहन करावा लागत आहे. रायगड जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबागच्या (Alibaug) परिसरातील नागरीकांची मात्र आता दुहेरी कोंडी झाली आहे. मुंबई आणि ठाण्याकडे (Mumbai And Thane) जाण्यासाठी येथील जनतेला एस टी सेवा बंद झाल्यानंतर जलमार्गाद्वारे मुंबई ते मांडवा (Mumbai To Mandwa) सेवा नौदल सप्ताहाच्या कार्यक्रमांमुळे ४ डिसेंबर पर्यंत बंद (Closed) ठेवण्यात आली आहे.

    विकेंडला जाणारे आठ ते दहा हजार प्रवासी

    दररोज मुंबईला या भागातून तीन ते चार हजार प्रवासी रोजी रोटी, शिक्षणासाठी ये जा करतात. तर या परिसरात मुंबईतील अनेकांची सेंकड होम आहेत, सुटीच्या काळात निवासासाठी विकेंडला या भागात शुक्रवार ते रविवार सोमवार या दिवशी आठ ते दहा हजार प्रवासी जलमार्गाने प्रवास करतात. त्यात रोरो सेवेसह या सेवा बंद झाल्याने नागरीकांची दुहेरी कोंडी झाली आहे, त्यांना खाजगी वाहनाने अलिबाग ते पनवेल असा प्रवास करावा लागत आहे, त्यानंतर पनवेल ते मुंबई लोकलने प्रवास करावा लागत आहे. अशी माहिती या भागातील प्रवांशानी दिली आहे.