Cleaning of cemeteries, cemeteries; Hiring a contractor at a lower rate will create a new controversy

मुंबईतील ४२ स्मशानभूमींच्या स्वच्छता राखण्यासाठी चार विभागांसाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. या निविदांमध्ये एकमेव कंपनी पात्र ठरली असून, चक्क ४६ टक्के कमी दरात त्यांनी हे काम मिळवले आहे. मात्र, उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मग स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी कमी दरात लावलेल्या बोली कशा चालतात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

    मुंबई : मुंबईतील स्मशानभूमी व दफनभूमींची स्वच्छता करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मग स्मशानभूमींच्या कमी बोली लावलेल्या निविदा कशा चालतात असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावरून स्थायी समितीत वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

    मुंबईत एका बाजूला महापालिकेने केलेल्या अंदाजित रकमेपेक्षा कमी दरामध्ये भरलेल्या निविदा रद्द करुन, त्यांची इसारा रक्कम रद्द केली जात आहे. तर दुसरीकडे स्मशानभूमी आणि दफनभुमीच्या स्वच्छतेसाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी चक्क उणे ४६ टक्के कमी दरात बोली लावणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

    मुंबईतील ४२ स्मशानभूमींच्या स्वच्छता राखण्यासाठी चार विभागांसाठी पालिकेने निविदा काढल्या आहेत. या निविदांमध्ये एकमेव कंपनी पात्र ठरली असून, चक्क ४६ टक्के कमी दरात त्यांनी हे काम मिळवले आहे. मात्र, उद्यान आणि मैदानांच्या देखभालीमध्ये कमी बोली लावण्यात आल्याने निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. मग स्मशानभूमींच्या स्वच्छतेसाठी कमी दरात लावलेल्या बोली कशा चालतात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

    मुंबईतील स्मशानभूमी, दफनभूमी स्वच्छ राखण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाऊसकिपिंगच्या सेवेची वाढीव मुदत ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे या कामांसाठी मागवलेल्या निविदा ३१ मे २०२१ रोजी उघडण्यात आल्या. यामध्ये प्रति चौरस फूट प्रति महिन्यासाठी १.६९ एवढा दर निश्चित करुन निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये पात्र ठरलेल्या सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ०.९१ एवढा दर लावला, तर अन्य कंपन्यांनी जास्त दर आकारला आहे. त्यामुळे कमी बोली लावणारी सिक्स सेन्स कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चार भागांमध्ये पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे या कंपनीने अंदाजित दरापेक्षा चक्क ४६ टक्के कमी दराने काम मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

    यापूर्वी उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी काढलेल्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी अंदाजित खर्चापेक्षा कमी बोलली लावण्यात आल्याने त्या निविदा रद्द करून फेरनिविदा मागवल्या होत्या. आता स्मशानभूमींच्या सफाईसाठी कमी दरात मागवलेल्या निविदांबाबत लोकप्रतिनिधींची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.