मोठी बातमी! ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा, सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची सही

राज्यपालांनी ही फाईल आता राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्याकडे पाठवली आहे. त्याआधी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत ओबीसी मुद्द्यावर चर्चा झाली.

    मुंबई :  ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी स्वाक्षरी केली आहे. याआधी राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश राज्यपालांकडे पाठवला होता. त्यावर राज्यपालांनी काही त्रुटी काढल्या होत्या. त्यात राज्य सरकारने सुधारणा करत सुधारित अध्यादेश पुन्हा राज्यपालांकडे पाठवला. यावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे.

    राज्यपालांनी ही फाईल आता राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्याकडे पाठवली आहे. त्याआधी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत ओबीसी मुद्द्यावर चर्चा झाली.

    अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आभार मानले आहेत. अनेकदा काही शंका असतील, तर राजभवन त्याची खात्री करून घेत असतं. त्यानुसार आम्ही त्यांचं निरसन करून अध्यादेश परत पाठवला. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.