Clinical trial of BCG vaccine completed; The vaccine may be effective against corona

बीसीजी ही लस टीबीसाठी बनवण्यात आली असली तरी ती श्वसनमार्गाने पसरणाऱ्या इतर अजारांविरुद्धही काम करते. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात ही लस नवजात बालकांना देण्यात येते. ती अतिशय सुरक्षित असून बालमृत्यू दर कमी करण्यास उपयुक्त ठरते. ही लस ज्येष्ठ नागरिकांना कितपत संरक्षण देवू शकते हे या संशोधनातून कळेल. बीसीजी लस ही तसेच मोनोसायटीस व एनके पेशींच्या माध्यमातून काम करतात. लस घेतलेल्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती त्यामुळे अधिक कार्यक्षम होते व संसर्गाविरुद्ध परिणामकारक लढा देते. उच्च रक्तदाब, मधुमेह अशा सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ती खूप उपयुक्त ठरू शकते.

    मुंबई : पालिकेच्या केईएम रुग्णालयात बीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पार पडली. आता या ट्रायलची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आत्तापर्यंत ६० ते ७५ वयोगटातील जवळपास ११२ ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. दरम्यान, बीसीजी लस कोरोनावर प्रभावशाली ठरु शकते. शिवाय, ज्या ज्येष्ठ नागरिकांना ही लस दिली गेली आहे. त्यांना गेल्या ६ महिन्यांत कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आढळले नसल्याचे निरीक्षण केईएम रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी मांडले आहे.

    केईएम रुग्णालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीसीजी लसीसाठी भारतभरातून १५५५ जणांना बीसीजी आणि ७७८ जणांना नियंत्रण ग्रुपमध्ये सामील करण्याचे ठरले. म्हणजेच, ७७८ जणांना निवड बीसीजी लस दिली गेली नाही. दरम्यान, आता या सर्व नागरिकांचा अहवाल आयसीएमआरला पाठवला गेला आहे. सर्व ठिकांणाचा अहवाल एकत्र करुन आता याबाबतचा निष्कर्ष काढला जाईल. मात्र, केईएम रुग्णालयाच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लस कोरोनासाठी प्रभावशाली ठरु शकते.

    ११ ठिकांणाची निवड

    चेन्नई, दिल्ली, भोपाळ,अहमदाबाद,मुंबई, जोधपूर येथे हे संशोधन सुरू झाले. नंतर म्हैसूर, कोची,बंगळुरू येथील केंद्रे मिळून ११ ठिकाणांहून बीसीजीसाठी ज्येष्ठ व्यक्तींचे नोंदणीकरण करण्यात आले.

    हाॅटस्पाॅट परिसरातून नागरिकांची निवड

    मुंबईतील विशेषतः एफ साऊथ, जी साऊथ या हाॅटस्पाॅट ठरलेल्या विभागात पोस्टर्स लावून व घरोघरी जावून ज्येष्ठ नागरिकांना या संशोधनाबद्दल माहिती दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी संमती दिली त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचा आधी स्वॅब घेण्यात आला व रक्त चाचणी करण्यात आली. छातीचा एक्सरे काढण्यात आला.

    या चाचण्यांचे अहवाल तपासून ते निगेटिव्ह आल्यानंतर बीसीजी लस देण्यात आली. त्यानंतर पहिले दोन महिने दर आठवड्याला फोन करून आणि तीन महिन्यांनी प्रत्यक्ष भेटून, स्वॅब आणि रक्तचाचणी करण्यात आली. पाचव्या महिन्यात पुन्हा फोनवर तर सहा महिन्यांनी स्वाब रक्तचाचणी व एक्स-रे करण्यात आला. सर्व सहभागी व्यक्तींचा सहा महिने पाठपुरावा करण्यात आला. दरम्यान, येत्या एक किंवा दोन महिन्यांत या संशोधनाचे निष्कर्ष उपलब्ध होतील. केईएम रुग्णालयातील सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे या संशोधनात सहकार्य लाभले आहे.

    काय आहे बीसीजी?