शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच "आशा" असे या विकसित भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले. शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.

    मुंबई : शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली. आज ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्षा येथील समिती कक्षात झालेली ही ७६ वी बैठक होती.

    एरिया अराऊंड शिर्डी हब एअरपोर्ट म्हणजेच “आशा” असे या विकसित भागाचे नाव असेल. या भागाचा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी नावीन्यपूर्ण आणि सुनियोजित विकास करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

    दरम्यान या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते. शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यात आली असल्याने त्यामुळं स्वाभाविकपणे तेथील अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळेल, तसेच अनेकांना रोजगार उपलब्ध होतील. दळणवळण यंत्रणांना गती मिळेल, आर्थिक उलाढाल होईल त्यामुळं या परिसरातील विकास सुद्धा होईल असं बैठकीत म्हटले गेले. त्यामुळं शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसराची निवड करण्यात आल्याने शिर्डीवासियांनी समाधान व्यक्त केलं आहे.