मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण, एका क्लिकवर दिसणार ८० पेक्षा अधिक सेवांची माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱया विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर आता अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. किंवा तुम्हांला एखाद कामाची स्थिती किंवा मुंबईतील सेवांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

    मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱया विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर आता अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे. किंवा तुम्हांला एखाद कामाची स्थिती किंवा मुंबईतील सेवांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

    बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच मा. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे  आणि व्हॉटस्ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) श्री. शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित राहतील.

    कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे, सदर कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडणार आहे. त्‍याचे थेट प्रक्षेपण महानगरपालिकेच्या यू ट्यूब चॅनल (MyBMC My Mumbai) वर पाहता येईल. त्‍याची लिंक सोबत दिली आहे. महानगरपालिकेचे ट्व‍िटर हॅंडल @mybmc आणि फेसबूक अकाऊंट MyBmc वर देखील हे प्रक्षेपण पाहता येईल. त्यामुळं याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे.